Skip to content Skip to footer

साताऱ्याचे राजे भाजपच्या वाटेवर ?

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. शिवेंद्रराजे भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रयत्नशील असल्याचेही बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता याचदरम्यान साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे राष्ट्रवादी कडून उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे आता सचिन अहिरे यांच्या नंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाने राष्ट्रवादीला अजून एक धक्का बसणार आहे.

Leave a comment

0.0/5