Skip to content Skip to footer

भाजपा नेत्याची जीभ घसरली, दीपिका पदुकोण तुकडे-तुकडे गँगची समर्थक

भाजपा नेत्याची जीभ घसरली, दीपिका पदुकोण तुकडे-तुकडे गँगची समर्थक

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात सिने अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी जेएनयू विद्यापीठाला भेट दिली. आपण आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचे दीपिका पदुकोण यांनी बोलून सुद्धा दाखविले होते. मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले होते. पाऊणे आठ वाजता जेएनयू मध्ये पोहचलेल्या दीपिका दहा मिनिटे तेथे थांबल्या होत्या. त्यावेळी जेएनयू विध्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्षांनी “जय भीम”च्या घोषणा दिल्या. परंतु दीपिका पदुकोण यांनी जेएनयू विद्यापिठाला ही दिलेली भेट भाजपा नेत्यांना चांगलीच झोंबलेली दिसून येत आहे.

दीपिकाने तुकडे-तुकडे आणि अफझल गँगचे समर्थन केलेले आहे त्यामुळे तिच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन भाजपा प्रवक्ते तेजिंदरपाल सिहं यांनी केलेले आहे.तर अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी दीपिका पदुकोणचे कौतुक केले आहे. दीपिका पदुकोणने जेएनयू विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत होत्या. परंतु या प्रकरणानंतर भाजपा नेत्यांनी कुठेतरी दीपिका पदुकोण यांना टार्गेट केलेले आहे.

Leave a comment

0.0/5