Skip to content Skip to footer

वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला मुख्यमंत्र्यांचा सत्कार

वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला मुख्यमंत्र्यांचा सत्कार

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले आहे. त्यानिमित्ताने बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी २३ जानेवारी रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या या सत्काराला देशातील प्रमुख राजकीय पक्षांचे मान्यवर नेते आणि विविध क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

आर्थिक संकटात अडकलेल्या लालपरीला शासनाकडून २०० कोटीची मदत

‘मराठी अस्मिता, मराठी माणूस आणि मराठी भाषा या त्रिसूत्रीसाठी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सुमारे पाच दशकापूर्वी स्थापन केलेल्या शिवसेनेचा जनाधार सर्व भाषिक व सर्व धर्मियांत निर्माण झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल हे वचन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्या वचनाची पूर्ती करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सफल झाले आहेत. हा संदेश प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहोचावा यासाठी बाळासाहेबांच्या जयंतीला मुख्यमंत्र्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे,’ अशी माहिती परिवहन व संसदीय कार्य अनिल परब यांनी पत्रकारांना दिली आहे.

Leave a comment

0.0/5