Skip to content Skip to footer

भाजपचे आमदार आता टोप्या घालून निषेध व्यक्त करणार का?

भाजपचे आमदार आता टोप्या घालून निषेध व्यक्त करणार का?

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे आराध्य दैवत आहे. परंतु भाजप नेत्यांच्या किळसवाण्या बुद्धीने मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे पुस्तक ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ भाजपा नेत्यांनी दिल्ली येथे प्रकाशित केले आहे. हा समस्त छत्रपतीच्या मावळ्यांचा आणि मराठी जनतेचा अपमान  आहे. आज आपण कोणत्या महापुरुषांबरोबर मोदी यांची तुलना करत आहोत इतकी समज सुद्धा आज भाजपा नेत्यांमध्ये राहिलेली नाही आहे. परंतु या घडलेल्या सर्व घडामोडींवर राज्यातील भाजपा नेते मुग गिळून गप्प बसलेले दिसून येत आहे.

काहीच दिवसांपूर्वी वीर विनायक दामोदर सावरकर यांचा काँग्रेसने केलेल्या अपमनाबद्दल “आम्ही सावरकर” लिखित टोप्या घालून भाजपा नेत्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन गाजवले होते. विशेष करून माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या आमदारांनी सावरकर यांच्या अपमानाबद्दल संपूर्ण सभागृह त्याग केला होता. परंतु आपल्या एका नेत्याने छत्रपतींचा केलेल्या अपमानावर एक चुकार शब्द सुद्धा काढलेला नाही आहे. तसेच भाजपा पक्षातील मराठा समाजातील आमदार सुद्धा शांत बसलेले आहे. म्हणजे आज आपल्या नेत्यांना वाचवण्यासाठी राज्यातील भाजपा आमदार शांत बसलेले दिसून येत आहे.

तर ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे कर्ता-धर्ता कोण ? तर या महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय जयभगवान गोल आहे. यांनीच दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. परंतु आज हे प्रकरण घडलेले असताना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुंगटीवार, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांनी साधा निषेध सुद्धा व्यक्त केलेला नाही आहे. त्यामुळे भाजपाचे छत्रपती शिवाजी महाराजनबद्दल असलेले खोटे प्रेम दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5