Skip to content Skip to footer

घड्याळवाले आमचे पार्टनर आहेत – मुख्यमंत्री

घड्याळवाले आमचे पार्टनर आहेत – मुख्यमंत्री

कृषी विज्ञान केंद्राच्या ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज बारामतीत झाले. उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी चंद्रपुरातील शेतक-याने तांदळाच्या वाणाचा शोध लावला आणि त्या वाणाला काय नाव द्यायचे या विवंचनेत हातावरच्या घड्याळाचे नाव दिले ”एचएमटी” अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सुप्रिया सुळेंनीही मला प्रश्न केला होता, तुमचे घड्याळाचे दुकान आहे का?, त्यावर मी म्हणालो, नाही. घड्याळवाले माझे पार्टनर आहेत. उद्धव ठाकरेंनी हा संवाद मंचावरून सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “ती वेळ जुळून यावी लागते, नाहीतर काही उपयोग नसतो. अशी सगळी चांगली वेळ जुळून आली आहे. योग्य वेळेला महाराष्ट्राची सत्ता आपल्या हाती आली आहे.”‘कृषिक’ प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता आमिर खान, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5