Skip to content Skip to footer

चंद्रकांत पाटील यांनी आपलेच शब्द फिरविले

चंद्रकांत पाटील यांनी आपलेच शब्द फिरविले 

पिंपरी-चिंचवड इथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात बोलताना प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. पण थोडा बदल झाला. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे. असे उदगार जाहीर सभेत पाटील यांनी काढले होते. परंतु आता चंद्रकांत पाटलांनी आपल्याच वक्तव्यावरून यु-टर्न घेतलेला आहे.

आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यलयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला चंद्रकांत पाटील यांच्या बरोंबर माजी मंत्री विनोद तावडे आणि भाजपा प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते. आपण असे बोललोच नाही पत्रकार समूहानेच आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून बातम्या पसरवलेल्या आहे असे बोलून आपल्या वक्तव्याचे खापर पत्रकार समूहावर फोडले आहे. परंतु पिपरी-चिंचवड येथे केलेल्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सध्या सर्वत्र फिरत आहे. त्यामुळे पाटील हे खोटे बोलताना दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले कोल्हापूरच्या आंबाबाईचे दर्शन

Leave a comment

0.0/5