Skip to content Skip to footer

तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्याने चक्क राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षाला पाठवली कोर्टाची नोटीस !

तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्याने चक्क राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षाला पाठवली कोर्टाची नोटीस !

भारतीय जनता पक्षाच्या तालुका पदाधिकारी निवडणीवरून सुरु झालेल्या वादात चक्क भाजपा कार्यकर्त्यांने भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यत या नोटीसाची चर्चा रंगताना दिसत आहे.

घडलेले प्रकरण असे की, पाथर्डी येथील तालुका कार्यकारिणीच्या निवडणीमध्ये पक्षाच्या घटने विरोधात असल्याचा आक्षेप घेत एका गटाने भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनाच नोटीस पाठवली आहे. तसेच कारवाही न केल्यास कोर्टात जाण्याची धमकी सुद्धा त्या कार्यकर्त्याने अध्यक्षांना दिली आहे. ही नोटीस नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे.

विशेष म्हणजे नोटिसांचा खर्च पाच हजार रुपये मंडळ अध्यक्ष माणिक खेडकर व आमदार मोनिका राजळे यांनी द्यावा, असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर रंगलेल्या या घटनेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, आता या नोटीसला भाजपा पक्षश्रेष्ठी काय उत्तर येते, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

0.0/5