Skip to content Skip to footer

शहीद जवानाच्या लेकिला प्रवेश नाकारणा-या शाळेवर मंत्री बच्चू कडूंनी केली कारवाई

शहीद जवानाच्या लेकिला प्रवेश नाकारणा-या शाळेवर मंत्री बच्चू कडूंनी केली कारवाई

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देशाकरीता शहीद झालेल्या जवान संभाजी कदम यांच्या ६ वर्षाच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारणा-या शाळेवर कारवाई करण्याचे आदेश संबंधीत अधिका-याला दिल्याची माहिती आहे. वीरपत्नी शीतल कदम महिला नांदेड जिल्ह्यातील शहीद संभाजी कदम यांच्या लेकीला शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करत होत्या. मात्र शाळेच्या प्रशासनाने याची कोणतीही दखल न घेता वीरपत्नी शीतल कदम यांना अपमानास्पद वागणूक दिली. माध्यमांशी ही बातमी लावून धरल्यानंतर राज्य सरकारने संबंधित प्रकरणावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

वीरपत्नी शीतल कदम यांना आपल्या लेकीला चांगले शिक्षण देऊन मोठे अधिकारी बनविण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी चांगल्या शाळेत तिला प्रवेश मिळावा यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. जम्मू काश्मीरमध्ये नोव्हेंबर २०१६ रोजी नांदेड जिल्ह्यातील जानापुरी गावचे संभाजी कदम जवान शहीद झाले. संभाजी कदम यांच्या अत्यंविधीवेळी याच जिल्ह्यातील नव्हे तर आजुबाजुच्या जिल्ह्यातील हजारो लोक दर्शनासाठी आले होते. संभाजी कदम यांना तेजस्विनी नावाची मुलगी आहे तिचे वय ६-७ वर्ष आहे. अनेक शाळांचे उंबरठे झिजवूनही लेकीला शाळेत प्रवेश मिळाला नाही. वर्षभरापासून शाळेच्या प्रवेशासाठी प्रयत्न करुनही यश मिळाले नाही.

https://www.facebook.com/BacchuKaduOfficial/photos/a.1715151078718178/2620822868150990

Leave a comment

0.0/5