Skip to content Skip to footer

आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाहीची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मागणी

आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाहीची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मागणी

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी एका महिलेला लाजवेल असे वक्तव्य केले होते. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यासाठी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत,” असं संतापजनक विधान लोणीकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याबद्दल सर्व स्थरातून लोणीकर आणि भाजपा पक्षावर टीका होताना दिसत आहे. यात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे.

एका महिला अधिकाऱ्याविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मराठवाड्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने टीका केली आहे. लोणीकर यांचे वक्तव्य अशोभनीय असून, महिलांचा अपमान करणारे असल्याची टीका प्रदेश काँग्रेसने ट्विटरद्वारे केली आहे. या प्रकरणी लोणीकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही लोणीकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे .

Leave a comment

0.0/5