Skip to content Skip to footer

चंद्रकांतदादा निवडणुका लागल्या तर तुम्ही कुठून उभं राहणार पुणे की कोल्हापूर

चंद्रकांतदादा निवडणुका लागल्या तर तुम्ही कुठून उभं राहणार पुणे की कोल्हापूर

               सरकार चालले नाही तर मध्यवर्ती निवडणूका होतील आणि येणाऱ्या डिसेंबर महिन्यात या निवडणूका होऊ शकतात असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा कोथरुड मतदार संघाचे आमदार चंद्रकात पाटील यांनी केले होते. पाटील यांनी पुण्यात हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मनसे नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

                चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून अजूनही सत्ता गेली हे त्यांच्या पचनी पडत नाही असं दिसतं आहे. अजूनही भाजपला वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार पडेल, असं म्हणत चंद्रकांतदादा निवडणुका लागल्या तर तुम्ही कुठून उभं राहणार पुणे की कोल्हापूर?, असा सवाल रूपाली पाटील ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे. तसंच आम्ही लढायला तयार आहोत असं सांगत तुम्ही कुठून लढणार हे फक्त सांगा, असं आव्हानही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे.

                  चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदार संघातून निवडून आलेले आहे. कोथरूड मतदार संघाचे माजी आमदार मेघा कुलकर्णी यांनी दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीला पाटील यांचे नाव कोथरूड मतदार संघासाठी जाहीर होताच तेथील जनतेने आणि भाजपा कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या नावाला विरोध दर्शवला होता.

Leave a comment

0.0/5