Skip to content Skip to footer

राणीच्या बागेत दोन नव्या पाहुण्याचे आगमन

राणीच्या बागेत दोन नव्या पाहुण्याचे आगमन

 संभाजी नगर मधील सिद्धार्थ प्राणी संग्रालयातून २ वाग मुंबीएच्या राणीच्या बागेत दाखल झाले आहे. मुंबईच्या जिजामाता प्राणी संग्रहालयात आता या वाघाचे वास्तव्य असणार, करिष्मा आणि शक्ती अशी या दोन वाघांची नावं आहेत. संभाजी नगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात जास्त वाघ झाल्याने या वाघांना संभाजीनगरहुन हलवण्यात आले आहे.

             पेंग्विनच्या पाठोपाठ आता देश-विदेशातील १०० पक्षी जवळून न्याहाळण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या सोबतच बिबळ्या, अस्वल, कोल्हा, तरस, कासव यांचेही दर्शन घडणार आहे. पक्ष्यांसाठी तब्बल पाच मजली मुक्त पक्षीविहार बांधण्यात आला असून प्राण्यांसाठी काचेच्या भिंती असणारी अत्याधुनिक दालने उभारण्यात आली आहेत. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीची बाग अनेक वर्षांपासून मुंबईकरांचे आकर्षण आहे.

Leave a comment

0.0/5