Skip to content Skip to footer

शिवसेना खासदार बारणे यांचे छत्रपती संभाजी राजेंकडून कौतुक

शिवसेना खासदार बारणे यांचे छत्रपती संभाजी राजेंकडून कौतुक

राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मावळमधील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आप्पा यांच्यामध्ये जी तळमळ दिसते, ती फार कमी खासदारांमध्ये असते. आप्पांपेक्षा एकाच गोष्टीत मी सरस आहे, त्यांची उपस्थिती ९१ टक्के आहे, तर माझी ९९ टक्के. तात्पर्य काय, तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती राखण सोपं नाही, असं छत्रपती संभाजी राजे म्हणाले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमाला खासदार संभाजी राजे उपस्थित होते.

             जेव्हाही मी तेव्हा फोन करायचो, कुठे आहात आप्पा तुम्ही? ज्या मिनिटाला अधिवेशन संपायचं, त्याच्या पुढच्या क्षणाला मतदारसंघात कसं पोहचायचं, यासाठी त्यांची तळमळ असते. दुसऱ्या दिवशी फोन केला कुठे आहात? तर अधिवेशनाला न चुकता ते हजर असतात, तुम्ही निवडून दिलेला खासदार सार्थ आहे, अशा शब्दात छत्रपती संभाजी राजेंनी श्रीरंग बारणेंचं कौतुक केले.

             मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेमकी काय परिस्थिती आहे, यासाठी युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना माझा सारखा फोन असायचा. आप्पा, काय परिस्थिती आहे? बारणे म्हणायचे, राजे काही काळजी करु नका. तुम्हाला काळजी नाही हो, पण आम्ही तिथे बसलेलो असायचो पश्चिम महाराष्ट्राच्या टोकाला, कोपऱ्यात, तिथे आमची धाकधूक वाढत होती असे सुद्धा बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5