Skip to content Skip to footer

खासदार ओवेसींच्या व्यासपीठावरून तरुणीने दिल्या “पाकिस्तान झिंदाबाद”चे नारे

खासदार ओवेसींच्या व्यासपीठावरून तरुणीने दिल्या “पाकिस्तान झिंदाबाद”चे नारे

                खासदार आणि एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आपल्या स्वतःच्या बेताल वक्तव्याने अनेकवेळा स्वतःला आणि आपल्या पक्षाला अडचणीत आणले आहे. काल बंगलोर येथे झालेल्या त्यांच्या सभेला एका तरुणीने स्टेजवर येऊन त्यांच्या समोरच “पाकिस्तान झिंदाबाद”चे नारे दिले होते. या घडलेल्या घटनेबाबतचा विडिओ एनआयएन या वृत्त संस्थेने ट्विट केला आहे. या घडलेल्या घटनेनंतर सर्व बाजूंनी ओवेसी आणि त्या तरुणीवर जोरदार टीका होत आहे.

                 सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरूमध्ये आंदोलन करण्यात आले होते. यावेळी ओवेसी यांचे भाषणही झाले. मात्र, ओवेसीं भाषण करण्यासाठी उभे राहिल्यानंतर एका तरुणीनं व्यासपीठावर गोंधळ घातला. अमुल्या नावाच्या तरुणीने अचानक व्यासपीठावर येऊन माईक हातात घेतला आणि बोलण्यास सुरूवात केली. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने तिचे बोलणे सुरूच ठेवले होते.

Leave a comment

0.0/5