गुलबर्ग्यातल्या सीएए कायदया विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात माजी आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरातून पठाण यांच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली दिसून येत आहे. आम्ही १५ कोटी आहोत मात्र १०० कोटींना भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील त्याच्या मदतीला धावून आले आहेत.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वारिस पठाण यांची भेट घेतली आहे. तब्बल तासभर जलील आणि पठाण यांंच्यात चर्चा झाली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले, “वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याची पाठराखण सुद्धा केली. तसेच लवकरच आम्ही पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करू असे बोलून पठाण यांना वाचवण्याचा प्रयत्न जलील यांनी केलेला दिसून आहे.