Skip to content Skip to footer

आता पर्यंत भविष्य सांगणाऱ्यांचं जे झालं तेच राणेंचं होणार – बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते, अशी भविष्यवाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी केली होती. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राणे आणि त्यांचे पुत्र महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांच्या या टीकेला आता महाविकास आघाडीचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रतिउत्तर दिलेले आहे.

थोरात म्हणाले राणे आता भविष्य सांगायला लागले आहे ते आता भविष्यवाल्यांबरोबर गेल्याने अशा भविष्यवाण्या करायला लागले आहेत. पण आतापर्यंत जे भविष्य सांगत होते त्याच जे झालं तेच राणेंचं होईल, असा टोला सुद्धा थोरातांनी राणेंना लगावला आहे. राणे हे भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यावेळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी बाबत भाष्य केले होते.

Leave a comment

0.0/5