Skip to content Skip to footer

फडणवीसांच्या प्रश्नाला मंत्री आदित्य ठाकरेंच सडेतोड उत्तर.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर केलेल्या वक्तव्याचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी ट्विटरच्या माध्यमातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही असे त्यांनी म्हटले होते. त्याला आता आदित्य ठाकरे यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे.

भायखळा मतदार संघाचे माजी आमदार वारीस पठाण यांनी १०० कोटी विरुद्ध १५ कोटी असे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक येथे केले होते. या वक्तव्यानंतर शिवसेना पक्षाने प्रथम वारीस पठाण याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. तसेच मुंबई येथे ठिकठिकाणी पठाण याचे शिवसैनिकांनी पुतळे जाळून निषेध व्यक्त केला होता. परंतु अनेक सभांमध्ये एकत्र दिसणाऱ्या फडणवीसांच्या भाजपा पक्षाने साधा निषेध सुद्धा व्यक्त केला नव्हता आणि आज तेच सत्तेच्या हव्यसापोटी टीका करत आहे.

Leave a comment

0.0/5