Skip to content Skip to footer

भीमा कोरेगाव आणि मराठा आंदोलनातील गुन्हे मागे – सुभाष देशमुख

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणातील ३४८ कार्यकर्त्यांवर नोंद झालेले गुन्हे तसेच मराठा क्रांती मोर्च्यावेळी ४६० आंदोलकांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे अखेर महाविकास आघाडी सरकारने मागे घेतलेले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात दिलेली आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून गुन्हे मागे घेण्याचा प्रलंबित प्रश्न चालू सरकारने तात्काळ निकाली काढलेला आहे. तसेच या प्रकरणातील अनेक गुन्हे मागे घेण्यात येतील, असे सुद्धा गृहमंत्र्यांकडून सांगण्यात आलेले आहे.

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अनेकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. तसेच त्याच काळात संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी सुद्धा लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले होते. या दोनही मोर्चावेळी अनेकांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते. या सर्व प्रकरणात आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी अनेक स्तरांतून होत होती. परंतु हा प्रश्न फडणवीस सरकारने हा विषय तात्कळत ठेवला. अखेर नव्याने स्थापन झालेल्या ठाकरे सरकारने हा विषय निकाली काढलेला आहे.

Leave a comment

0.0/5