माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मोठा घोटाळा झाल्याची चर्चा आता कॅबिनेटच्या बैठकीत होत आहे. सिडकोवर कॅगने ताशेरे ओढले असून, सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्याची माहिती आहे. त्यावर कॅबिनेटमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
कॅबिनेटमध्ये कॅगचा अहवाल सादर करण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना घडलेल्या एका किस्स्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘दोन्ही दादा म्हणजे अजित दादा असो की चंद्रकांत दादा दोन्ही संवेदनशील, ठोस तात्काळ निर्णय घेतात,’ असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पाटलांना टोला हाणला आहे.