Skip to content Skip to footer

सीमा भागात मराठी भाषिक शिक्षण संस्था सुरू करणार ! – मंत्री उदय सामंत

महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील मराठी भाषिक भागात मराठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन सीमा भागात मराठी शिक्षण संस्था चालू करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. सामंत हे आज कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी त्यांनी शिवाजी विद्यापीठात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यासाठी शिवाजी विद्यापीठाला प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी सुमारे पाच एकर जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यानंतर या कामाला गती देण्यात येईल, असे सामंत यांनी नमूद केले.

राज्यातील प्राध्यापकांची २७ हजार रिक्त पदे भरण्यास शुक्रवारीच शासनाने मान्यता दिली असून, विद्यापीठांनी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करायला हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a comment

0.0/5