Skip to content Skip to footer

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात नुकताच प्रवेश केलेले तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यावर जातीवाचक शिवी दिल्याप्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्यावर एका व्यक्तीने मारहाणीचा आणि जातीवरून शिवी दिल्याचा आरोप लावलेला आहे. या प्रकरणानंतर संभाजीनगर मधील राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता जाधव यांच्यावर प्रशासन कधी कारवाई करणार हा मुख्य मुद्दा आहे.

Leave a comment

0.0/5