Skip to content Skip to footer

मास्क, हँडवॉश रेशन दुकान उपलब्ध करून द्या, चंद्रकांत पाटलांची अजब मागणी

सध्या देशात आणि राज्यात कोरोना व्हायरस संदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरताना दिसून येत आहे. यावर प्रतिबंध आणण्यासाठी राज्य सरकारने आता कडक कारवाही करण्याचे आदेश दिलेले आहे. परंतु राज्यातील एका नेत्याने चक्क हँडवॉश आणि मास्क रेशन दुकानात उपलब्ध करून देण्याची अजब मागणी केलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी सभागृहात ही मागणी केली. जगभरात कोरोना व्हायरसने दहशत पसरवली आहे. भारतातही कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असून, महाराष्ट्रात कोरोना बाधीतांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे.

कोरोना व्हायरस महाराष्ट्रात सुद्धा आला असून, पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर लोकांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे मास्क आणि हँण्ड वॉश हे सर्वसामान्य व्यक्तींना घेणे परवडणारे नाही. त्यामुळे किमान रेशन घेणाऱ्या कुटुंबांना मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी विधानसभेत बोलताना पाटील यांनी केली. परंतु आरोग्य खात्याने मास्क हे डॉक्टरांच्या चिट्टी शिवाय न देण्याचे आदेश सर्व औषध विभागाला दिलेले आहे. तरीही पाटील यांनी ही मागणी सभागृहात केलेली आहे.

Leave a comment

0.0/5