Skip to content Skip to footer

“महाराष्ट्र विथ सीएम”ला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद

“महाराष्ट्र विथ सीएम”ला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद

राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना एक कुटुंबप्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. आज विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यवसायिक, सिनेअभिनेता, गायक तोंड भरून मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. आज वेळोवेळी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचे काम करताना मुख्यमंत्री दिसत आहेत.

जनतेसोबतच मुख्यमंत्री वेळोवेळी राज्यातील तज्ञ डॉक्टरांशी विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत, रुग्णांनाची व मृतांची संख्या कमी करण्यासाठी योग्य त्या उपययोजना करण्याचे सल्ले देत आहेत.

त्यांच्या या कार्याची दखल अख्या महाराष्ट्रातील जनतेने घेतलेली आहे त्यातूनच आता “महाराष्ट्र विथ सीएम” हे अभियान सुरू झाले आहे. आज या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंभीर उभी असलेली दिसून येत आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील 21 हजार लोक स्व इच्छेने कोविड योद्धे होण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्र्यांनी संयमाने घेतलेले निर्णय आपल्या हिताचेच आहेत यावर पूर्णपणे जनतेचे एकमत आहे.

Leave a comment

0.0/5