Skip to content Skip to footer

शिवसेनेने स्वीकारले ११ महिन्याच्या प्रियांशीचे मातृत्व – ठाणे येथे पाहावयास मिळाला शिवसैनिकांची माया

शिवसेनेने स्वीकारले ११ महिन्याच्या प्रियांशीचे मातृत्व – ठाणे येथे पाहावयास मिळाला शिवसैनिकांची माया

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या विळख्यात येऊन अनेक नागरिक कोरोनाग्रस्त झाले आहे. तसेच वाढत्या आकड्यामुळे अनेक ठिकाणी युद्धपातळीवर उपाययोजना व सामाजिक बांधिलकी जपून कामं केली जात आहेत. कोरोनाग्रस्तांना समाजातील अनेकांनकडून मदत, आधार आणि विशेष साथ मिळत असल्याचे अनेक प्रसंग आपण ऐकले असतील. परंतु आज ठाण्यामध्ये काही शिवसैनिकांनी मात्र या कार्याला आणखी उजळली देत समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

ठाणे येथे राहत असलेल्या पुजारी कुटुंबातील सर्वजण कोरोना बाधित झाल्याचे निदर्शनास आले असतानाच त्यांची अकरा महिन्याची कन्या प्रियांशी मात्र सुदैवाने कोरोनाच्या संसर्गापासून बचावली आहे. तिचे आई, वडील, आजी, आजोबा रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत असताना, त्यांच्या चिमुरडीचा सांभाळ करण्याची जबाबदारी शिवसैनिक बाळा मुदलियार यांची पत्नी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सौ. रीनाताई मुदलियार यांनी घेतली. ठाणे शिवसेनेच्या वतीने टिप टॉप प्लाझा येथे प्रियांशी व सौ.मुदलियार यांच्या रहाण्याची व्यवस्था करण्यात आली, असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील चिमुकल्या प्रियांशीची भेट घेतली, अगदी आपुलकीने चौकशी केली. तिच्या संगोपनाची जबाबदारी तिच्या पालकांना डिस्चार्ज मिळेपर्यंत आता आपली आहे, तिच्या संगोपनात कसलीही कमतरता येऊ नये याची दक्षता घ्या. तसेच आम्ही देखील गरज भासल्यास तुमच्या सोबत असू, असे शिंदे यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5