Skip to content Skip to footer

आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत पण एक विदूषक हवाय ! – शरद पवार

आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत पण एक विदूषक हवाय ! – शरद पवार

“महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही” राजनाथ सिंह यांनी केलेल्या या टीकेचा माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

“आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत. पण, विदुषकाची मात्र कमतरता आहे”, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समार घेतला. तोही अगदी त्यांच्या स्पेशल शैलीत. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी म्हणून पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या या उत्तरानंतर आता भाजप यावर काय बोलेल हे पाहावे लागणार आहे.

Leave a comment

0.0/5