शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास आनंदच – संजय राऊत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या संदर्भात काल दिवसभरात वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवर बातम्या दाखवण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणापासून ते दिल्लीच्या राजकारणापर्यंत याच विषयावर जोरदार चर्चा होताना दिसून येत होती. यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे,
शरद पवार यूपीएचे अध्य़क्ष झाल्यास आनंदच, मात्र अशा चर्चा सुरु नसल्याचे पवारांचे स्पष्टीकरण, विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मजबूत आघाडी देणं गरजेचे, काँग्रेसला काही निर्णय घ्यावे लागतील , असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला एकत्र अनुदान महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच आघाडी सरकारचे शरद पवार हे मार्गदर्शक सुद्धा आहेत.