Skip to content Skip to footer

पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर ?

पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर ?

महाराष्ट्र विधानसभेतील १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कार्यकाळाचा कालावधी संपणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते प्रत्येकी चार-चार जागा वाटुन घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळेली आहे. त्यामध्ये प्रत्येक पक्षाने एक-एक जागा ही मित्र पक्षाला द्यावी, असे पण सांगण्यात आले आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने राजु शेट्टीला ऑफर जाहीर केली होती. तसेच शिवसेनेकडून वंचितला ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

परंतु आता त्यात एक गोष्ट अत्यंत महत्वाची घटना घडत आहे. ती म्हणजे पंकजा मुंडे यांना शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारकीची ऑफर दिली असल्याचे समजत आहे. जर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेची ही ऑफर स्वीकारली तर याचा शिवसेनेला भविष्यात खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार असे तर्क देखील लावण्यात येत आहेत.

परंतु अजुन ही बातमी सूत्रांनी नक्की केलेली नाही. म्हणुन आता हेच पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे की, खरच शिवसेनेने पंकजा मुंडे यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीची ऑफर दिली आहे आणि जर दिली आहे तर पंकजा मुंडे ही ऑफर स्वीकार करणार की नाही?
तसेच जर ही ऑफर पंकजा मुंडे यांनी स्वीकारली तर भाजपाला हा सर्वात मोठा धक्का असेल, असे ही म्हटले जात आहे.

Leave a comment

0.0/5