Skip to content Skip to footer

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हीसीद्वारे साधणार मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी सवांद….!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हीसीद्वारे साधणार मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी सवांद….!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा होणार आहे. दुपारी तीन वाजता विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. या चर्चेमध्ये राज्यात कोरोना रूग्णांची नव्याने होणारी वाढ हा प्रमुख मुद्दा असेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा कोरोनातून बरे होण्याचा रूग्णांचा दर चांगलाच वाढला आहे. काल हा दर वाढून ५०.५९ वर गेला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर देखील चर्चा होणं अपेक्षित आहे.

कोरोना रूग्णांची संख्या जरी वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचा दर देखील दिवसेंदिवस वाढतो आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे मृत्यूदर घटवण्यात महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला यश आलं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे उद्धव ठाकरे पंतप्रधानांसमोर मांडू शकतात. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर यापुढच्या अनलॉकिंगवर मुख्यमंत्री – पंतप्रधानांमध्ये चर्चा होऊ शकते. तसंच याअगोदरच्या अनलॉकिंगमध्ये बऱ्याचश्या सवलती शासनाने दिल्या होत्या. आता नव्याने होणाऱ्या अनलॉकिंगमध्ये कोणत्या सवलती द्यायच्या यावरही चर्चा होणं अपेक्षित आहे.

Leave a comment

0.0/5