Skip to content Skip to footer

दोन दिवसात छत्रपती उदयनराजेंच्या भेटीला मविआचे दोन नेते भेटीला….!

दोन दिवसात छत्रपती उदयनराजेंच्या भेटीला मविआचे दोन नेते भेटीला….!

छत्रपती उदयनराजे भोसले यांची महाविकास आघाडीच्या दोन बड्या नेत्यांनी भेट घेतल्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या ‘जलमंदिर पॅलेस’वरील फेऱ्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकतेच काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. मात्र त्याआधी शिवसेना नेते आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनीही उदयनराजेंची भेट घेतल्याचे समोर आले आहे. ही भेट राजकीय भेट नसल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी ३ जुलै रोजी आढावा बैठकीच्या निमित्ताने सातारा दौरा केला. त्यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तर त्याआधी म्हणजे गुरुवारी २ जुलै रोजी शिवसेना नेते आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनीही उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते उदयनराजेंच्या गाठीभेटी का घेत आहेत, याची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे.

यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हणले की, ‘उदयनराजे भोसले आणि मी वर्गमित्र आहे. तसेच ही भेट सदिच्छा भेट होती’

Leave a comment

0.0/5