Skip to content Skip to footer

भाजपा आमदाराला कोरोनाची लागण, वाढदिवशी घेतली होती कार्यकर्त्यांची भेट !

भाजपा आमदाराला कोरोनाची लागण, वाढदिवशी घेतली होती कार्यकर्त्यांची भेट !

लातूर जिल्ह्यातील भाजपा आमदार अभिमन्यू पवार आणि त्यांच्या मुलाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतीची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरच्या अकाऊंटवरून दिलेली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांचा १ जुलै रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि शुभचिंतक त्यांना भेटायला आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी आमदारांना हलकासा ताप आणि खोकला सुरु झाला होता.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपली आणि आपल्या संपूर्ण परिवाराची कोरोना चाचणी करून घेतली असता त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील चार दिवसात जे आमदारांच्या संपर्कात आले आहे त्यांना सर्वांना होम क्वारंटाइन करून घावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5