Skip to content Skip to footer

…. मगच राणेंनी कोकणाच्या विकासाबद्दल बोलावे ; आमदार योगेश कदम.

…. मगच राणेंनी कोकणाच्या विकासाबद्दल बोलावे ; आमदार योगेश कदम.

सध्या कोरोना सोबतच अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधी पक्षात तुफान आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. परंतु आता एका नवा मुद्दा थेट कोकणातून उभा केला जात आहे. कोकणात झालेले राजकारण आणि आरोपांची माहिती कळताच सर्वप्रथम डोळ्यांसमोर उभार राहतात ते राणे पिता पुत्र. आज घडलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या सामन्यात देखील राणेंच सहभागी आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली व गुहागर हे महत्वाचे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. याच मतदारसंघांच्या प्रश्नांवरून निलेश राणे यांनी थेट माजी मंत्री रामदास कदम यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

एका आजारी वयोवृद्ध व्यक्तीला झोळीने जंगलातील वाटेवरून घेऊन जाणाऱ्या दोन मुलांनाच विडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला. रत्नागिरी जिल्ह्यातील रामदास कदम जिथे स्वतः २० वर्षे आमदार आणि पाच वर्षे मंत्री राहिले आणि आता मुलगा ह्या मतदारसंघात निवडून आलाय. खेड तालुक्यातील ९० वर्षाच्या आजोबांना लाकडाला झोळी करून ५-६ किमी दवाखान्यात न्यावे लागत आहे, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

त्यांच्या या टिकेविषयी विचारले असता दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘आधी कोकणातील मतदारसंघांचा अभ्यास करावा आणि मग विकासाच्या गप्पा माराव्यात’, असे खोचक प्रतिउत्तर कदम यांनी दिले आहे.हा प्रसंग ज्या गावामध्ये घडला आहे तो दापोली मतदारसंघात येत नाही. तर तो गुहागर विधानसभा मतदारसंघात येतो. मतदारसंघांची माहिती आणि संपूर्ण अभ्यासाचा अभाव असल्यामुळे निलेश राणे असं बेताल बोलले, आहेत असं ही योगेश कदम यांनी बोलून दाखवले.

माजी मंत्री रामदास कदम हे मंत्री व आमदार असताना रोजगार हमी योजनेतून या रस्त्याचे काम सुरु होऊन १.५ किमीचा रास्ता तयार झाला होता. परंतु मतदारसंघांच्या रचना बदलानंतर कावळे गावातील हे जानकरवाडी गुहागर मतदारसंघात गेले. त्यामुळे या रस्त्याचे कार्य रखडले, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिली. हे संपूर्ण प्रकरण ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्धीस आणून लक्ष वेधण्याचा निलेश राणेंनी प्रयत्न केला.

तसेच आमदार योगेश कदमांनी यावेळी “माझी बांधिलकी कोकणवासियांशी होती, आहे आणि राहणार”, असे विश्वासाचं वक्तव्य केलं. “या कामासाठी व मतदारसंघाच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

परंतु आता नेटकऱ्यांनी राणेंनाच या मुद्द्यावरून ट्रोल केल्याचे दिसून येत आहे. नारायण राणे माजी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, आमदार, आमदार त्यात तुम्ही स्वतः खासदार तुमचे बंधू आमदार असे पद भूषवून पण कोकणात तुम्ही केलेला विकास कोणता ते दाखवा ? असा प्रतिप्रश्नच नेटकरी व कोकणातील जनतेकडून राणेंना केला जात आहे.

Leave a comment

0.0/5