Skip to content Skip to footer

“आमदार पळवून न्यायला ती काय बैलजोडी आहे का?” – आमदार गुलाबराव पाटील.

“आमदार पळवून न्यायला ती काय बैलजोडी आहे का?” – आमदार गुलाबराव पाटील.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीकडे १७० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यातले ५० आमदार घेऊन जायला बैलजोडी आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच भाजपाने महाराष्ट्राकडे ढुंकूनही पाहू नये, असा समज वजा इशारा राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाला दिला आहे.

मध्यप्रदेश नंतर आता राजस्थानमध्ये सुद्धा भाजपाकडून काँग्रेस सरकार पडण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राजस्थाननंतर महाराष्ट्रात सुद्धा भाजपा असा प्रयोग करू शकते का? असा सवाल पत्रकारांनी विचारताच मंत्री पाटील यांनी खास आपल्या शैलीत या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

“मध्यप्रदेशात कॉंग्रेसची संख्याबळ कमी असल्याने सरकार पाडण्यात भाजप यशस्वी ठरले, मात्र राजस्थानमध्ये त्यांना जोरदार धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे स्वप्न तर भाजपने सोडूनच द्यावे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे १७० आमदारांचा पाठींबा आहे. अन् कुणीही पळून न्यायला आमदार काय बैल जोडी आहे का?” असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

Leave a comment

0.0/5