Skip to content Skip to footer

जोतिष फडणवीसांची भविष्यवाणी, म्हणून नेटकऱ्यांनी केले फडणवीसांना ट्रोल ; म्हणाले ‘सरकार आपोआप पडेल’

जोतिष फडणवीसांची भविष्यवाणी, म्हणून नेटकऱ्यांनी केले फडणवीसांना ट्रोल ; म्हणाले ‘सरकार आपोआप पडेल’

सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे काही आजी-माजी खासदार, आमदार गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. या भेटीदरम्यान अमित शहा आणि फडणवीस यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा झाली. या भेटीनंतर पत्रकार माध्यमांना उत्तर देताना आघाडी सरकार आपोआप पडेल, अशी भविष्यवाणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

मात्र या दिल्ली भेटीचे मुख्य कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. सध्या राजस्थान मध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी करून काँग्रेसचे सरकार अडचणीत आणले आहे. अशीच काहीशी परिस्थिती सध्या राज्यतील भाजपा नेते महाराष्ट्रात आणण्याच्या विचारात आहे असेच त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येते.

राज्यावर कोरोनाचे संकट आलेले असताना सुद्धा राज्यपालाच्या भेटी, राज्याला मदत न करता केंद्राला मदत करणे, आंदोलने, सरकारविरोधात पत्रकार परिषद असे अनेक प्रकार भाजपाच्या नेत्यांनी सुरुच ठेवले आहे. त्यामुळे भाजपा हे सरकार अस्थिर करण्याच्या मनसुब्यात आहे असेच दिसून येते.

यावर आघाडीत असलेल्या तीन पक्षात द्वेष निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजप करताना दिसत आहे. हे सरकार आपोआप पडेल अशी बतावणी करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपा करताना दिसत आहे. त्यात फडणवीसांची भविष्यवाणी खूप काही बोलून जाते.

Leave a comment

0.0/5