Skip to content Skip to footer

खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला यश…..!

खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला यश…..!  

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा आणि भविष्याचा विचार करून रेल्वे बोर्डाच्या रिकाम्या जागेवर केंद्र सरकारच्या अन्नपुरवठा विभागाकडून ५० लाख मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधणीची मागणी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून, या बांधणीला परवानगी मिळलेली आहे.

खासदार पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पिय अधिवेशनात हिंगोलीतील ओस पडलेल्या जागेवर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालासाठी मोठे गोदाम उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीला खासदार पाटील हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे.

Leave a comment

0.0/5