Skip to content Skip to footer

जळगावात शिवसेनेचे सत्ताधारी भाजप विरुद्ध ‘जागे व्हा’ आंदोलन..!!

जळगावात शिवसेनेचे सत्ताधारी भाजप विरुद्ध ‘जागे व्हा’ आंदोलन..!! 

“जागे व्हा, जागे व्हा…झोपलेले सत्येचे कुंभकरण जागे व्हा, रस्त्यातील खड्डे बुजवा..!” अशी घोषणा देत विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेनेने जळगाव महानगर पालिकेतील सत्तेत बसलेल्या भाजपाला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलन सुरु केले आहे. यावेळी सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या आयुक्तांचा सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या जळगावात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे साधं रस्त्यावरून चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे, अशा तक्रारी समोर येत होत्या. तसेच खड्डे पडल्यामुळे वाहन दुर्घटनेच्या घटना सुद्धा शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहे. मात्र या सर्व घटनांकडे पालिकेत सत्तेत असलेल्या पक्षाने कानाडोळा केला आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावकरांना तर सत्ता आमच्या हातात दिल्यास एका वर्षात संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करू अशी ग्वाही दिली होती. मात्र आज दीड वर्ष झाल्यावरही जळगाव जिल्ह्याचा हवा तसा विकास न झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. हाच मुद्धा पकडत शिवसेनेनं आंदोलन सुरु केले आहे.

Leave a comment

0.0/5