Skip to content Skip to footer

भाजपा जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल, जमिनीसाठी चक्क शेतकऱ्याला धमकावले…!

भाजपा जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल, जमिनीसाठी चक्क शेतकऱ्याला धमकावले…!

शिऊर तालुक्यातील करडे गावात पुणे जिल्हाध्यक्ष भाजपा विध्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष विशाल नीलकंठ घायतडक आणि त्याच्या साथीदारांविरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी तसेच गरीब शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी शिऊर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार करडे येथे गट न. ५२० येथे फिर्यादी शेतकरी एकनाथ दगडू घायतडक यांची जमीन असून, इतर चार भावांसह एकूण साडे सोळा एकर जमीन आहे. सदर जमिनीत आरोपी विशाल आणि त्यांचा साथीदार यांचा काहीही संबंध नसतानाही जमिनीतील २ ते ४ गुंठे जमीन जबरदस्तीने आम्हाला द्या, अशी वारंवार मागणी करून धमकी देत होते.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत एकनाथ घायतडक आणि त्यांचा भाऊ मोटार सायकलवरून शिऊरकडे येत असताना त्यांना अडवून आरोपीने आपल्या चार चाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. तसेच मागितलेली जमीन देत का नाही असे विचारणा करून हॉकी स्टिकने मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र घाबरलेल्या परिस्थितीत एकनाथ घायतडक घाबरून तिथून पळून निघून गेले .

 

याबाबत फिर्यादी यांनी तात्काळ शिरूर पोलीस स्टेशन येथे येऊन फिर्याद दिली असून, याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करीत आहे.

Leave a comment

0.0/5