Skip to content Skip to footer

जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून उद्या ही मुलाखत प्रसारित होणार आहे. सरकारला वर्ष पूर्ण होत आले, या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलखतीचा प्रोमो त्यांनी आज आपल्या ट्विटरवरून रिलीज करत ‘उद्या धमाका’ असे लिहिले आहे.

संजय राऊतांनी सरकारच्या वर्षपूर्तीवर मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखतीची पहिली झलक चांगलीच गाजताना दिसत आहे. यावेळी हात धुवा सांगण्यापलिकडे मुख्यमंत्र्यांनी काय केले असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे.

मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा देऊन उत्तर दिले आहे. यावर त्यांनी ”ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन”, असा इशारा दिला आहे. आता या मुलाखतीकडे शिवसैनिकासह विरोधकांचे सुद्धा लक्ष लागून राहिले आहे.

Leave a comment

0.0/5