Skip to content Skip to footer

शरद पवार कमी उंचीचे नेते ! ; उद्धव ठाकरे यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

शरद पवार कमी उंचीचे नेते ! ; उद्धव ठाकरे यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुण्यात एक कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकात पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा कमी उंचीचे नेते म्हणून उल्लेख केला होता. पुढे या वक्तव्यावरून संपूर्ण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पुढे पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सारवा-सारव केली होती. यावर आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पवारांविषयी याच संदर्भात प्रश्न विचारला होता.

‘शरद पवार हे देशातले, राज्यातले एक प्रमुख नेते आहेत. प्रदीर्घ काळाचा त्यांचा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शनसुद्धा सरकारला आहे. त्यांच्याविषयी भाजपाचे नेते सांगताहेत की, ते अत्यंत कमी उंचीचे नेते आहेत. त्यांची कुवतच नाही, ते लोकनेतेच नाहीत”, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी केलेल्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”होय, आता त्यांना ८० वर्षे पूर्ण होत आहेत. जाऊ द्या हो… असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणी सीरियसली घेत नाही ऐकू पण नये असली लोकं आहेत ही. हा महाराष्ट्राचासुद्धा आणि आपल्या नेत्यांचाही अपमान आहे. बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात!”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Leave a comment

0.0/5