Skip to content Skip to footer

महानगर पालिकेत शिवसेनेला बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – यशवंत जाधव

महानगर पालिकेत शिवसेनेला बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – यशवंत जाधव

मुंबईत शिवसेनेचा पालिकेच्या माध्यमातून विकासाचा आलेख वर चढत आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्यांना आतापासूनच मुंबई मनपात आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी कंत्राटदाराला हाताशी धरून आपल्यावर धमवकावल्याचा नाहक आरोप केला आहे. तसेच हे भाजपचे षडयंत्र आहे, असा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

मात्र माझ्यावर लावलेल्या आरोपांचा पुराव्यानिशी भांडाफोड करणार, असे सुद्धा अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बोलून दाखविले. कंत्राटदाराला धमकावल्याचे वृत्त खोटे आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित कंत्राटदाराने इतर विभागात केलेली कामे अत्यंत निष्कृष्ट दर्जाची आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काम देऊ नये अशीच आपली भूमिका आहे, असे सुद्धा जाधव यांनी बोलून दाखविले.

तसेच संबंधित कंत्राटदाराने वशिल्यासाठी केलेल्या फोनची क्लिप आपल्याकडे आहे. त्या लवकरच जाहीर करू असे सुद्धा जाधव यांनी बोलून दाखविले. आज निष्कृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारावर दक्षता विभागाने काय कारवाई केली असा प्रश्न सुद्धा जाधव यांनी उपस्थित केला होता.

Leave a comment

0.0/5