Skip to content Skip to footer

नागपूरचे महापौर संदीप जोशी राजीनामा देण्याच्या तयारीत ?

नागपूरचे महापौर संदीप जोशी राजीनामा देण्याच्या तयारीत ?

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव केला. त्यात आता नागपूर मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पदवीधर निवडणूकीतील पराभवामुळे राजीनामा देणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप जोशी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता ते सध्या नॅाट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे.

या राजीनाम्याविषयी भाजपच्या नेत्यांना विचारले असता त्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. त्यामुळे याबद्दल आज दिवसभरात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. खरंतर, गेल्या ५५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने झेंडा फडकवला आहे.

काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना ६१ हजार ७०१ मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना ४२ हजार ९९१ मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा १८ हजार ७१० च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला. यामुळे संदीप जोशी यांनी पराभव स्वीकारत राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे.

Leave a comment

0.0/5