Skip to content Skip to footer

रावसाहेब दानवेंनी पोलिसांना पुरावे द्यावे : सतेज पाटील

रावसाहेब दानवेंनी पोलिसांना पुरावे द्यावे : सतेज पाटील

देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या १२-१४ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. यावर मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य करताना, शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला होता. आता दानवे यांच्या या वक्तव्याचा राज्यमंत्री सतेज पाटील यांनी खरपसू समाचार घेतला होता.

शेतकरी आंदोलनाबाबत रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून, त्यांच्याकडे याबाबबतचे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांना द्यावेत आणि आपल्या वक्तव्यावर ठाम राहावे, असा खोचक सल्ला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे.

सतेज पाटील म्हणाले की, “रावसाहेब दानवे हे एक ज्येष्ठ राजकीय नेते आहेत, त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणं चुकीचे आहे. शेतकऱ्यांबद्दल सर्व देशभरात सहानुभूतीचे वातावरण आहे, असे असताना दानवे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य कोणत्या पुराव्याच्या आधारे केलं हे त्यांनी स्पष्ट करावं. जर त्यांच्याकडे असे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत आणि स्वतःच्या वक्तव्यावर ठाम राहावे”, असा पाटील यांनी सल्ला दानवेंना दिला आहे.

Leave a comment

0.0/5