Skip to content Skip to footer

भाजपचे राजकारण म्हणजे ‘मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे – अब्दुल सत्तार

भाजपचे राजकारण म्हणजे ‘मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे – अब्दुल सत्तार

शिवसेना नेता आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना आवाहन दिले आहे. “जो पर्यंत दानवे यांचा पराभव करत नाही तो पर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही” असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांना दिले आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे असा नवा वाद राज्यात पेटताना दिसून येत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत रावसाहेब दानवे यांनाही डिवचले आहे.
जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणा नाही, असं सत्तार म्हणाले. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपकडून होत असलेल्या राजकारणाचाही समाचार घेतला. राम मंदिराच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण म्हणजे ‘मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे” अशी टीकाही त्यांनी केली.

Leave a comment

0.0/5