Skip to content Skip to footer

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका, बहुतांश मंत्र्यांची महाराष्ट्र प्रभारींसमोर भूमिका

बाळासाहेब थोरात यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला खरंतर दीडच वर्ष झालं आहे. पण सध्या सीएलपी, महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद ही तीनही पदं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे काँग्रेसमधल्या एका गटान त्याबाबत ही मोहीम सुरु केली

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका, अशी भूमिका बहुतांश मंत्र्यांनी महाराष्ट्र प्रभारी यांच्यासमोर मांडली आहे. राज्यात घडी बसली आहे. सरकार स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील समोर आहेत. अशा वेळी बाळासाहेब थोरात यांना बदलण्याचे औचित्य किंवा कारण दिसत नाही, अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या समोर मांडली.

दोन दिवस एच के पाटील हे मुंबईत येऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोण असावे याची चाचपणी करत आहेत. सकाळपासून त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर वैयक्तिक संवाद साधला. दुपारनंतर प्रभारी काँग्रेस आमदारांशी बोलणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा कल जाणून घेतला.

Leave a comment

0.0/5