Skip to content Skip to footer

मेट्रो कारशेड जागेचा तिढा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडवतील – अजित पवार

मेट्रो कारशेड जागेचा तिढा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडवतील – अजित पवार

मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या जागेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. त्यात ठाकरे सरकारने मेट्रो करशेडसाठी निश्चित केलेल्या कांजूरमार्ग येथील जागेवर केंद्राने आपला हक्क सांगून कोर्टातर्फे MMRDA ला काम थांबवण्याचे आदेश दिले होते. यावरून केंद्र आणि राज्य सरकार असा नवा वाद राज्यात पाहायला मिळाला होता.

यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे. मुंबईतील हिरव्यागार परिसरात आरे कारशेड करणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पूर्वीपासून मान्य नव्हते. मग कांजूर मार्गचा पर्याय समोर आला. आता काही जण म्हणतात, ती जागा केंद्र सरकारची आहे. एक जण म्हणतो, माझी आहे. राज्याचे अधिकारी म्हणतात, राज्याची आहे. असे काही ना काही सुरू आहे. मुख्यमंत्री यात स्वतः लक्ष देत आहेत, ते मार्ग काढतील असं वक्तव्य त्यांनी केले आहे.

पुढे विधान परिषदेच्या निकालावरून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी लावलेल्या आरोपांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत गडबड झाल्याचा चंद्रकांत पाटलांचा आरोप असेल तर त्याची चौकशी करा. आमचे काहीही म्हणणे नाही. पराभव झाला की अशा गोष्टी पुढे आणल्या जातात. लोकसभा निवडणुकीचा निकाल आला तेव्हाही यात निकाल मॅनेज केला असे बोलले जायचे. पण असे होत नाही, असा टोलाही अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

Leave a comment

0.0/5