Skip to content Skip to footer

शेतकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करा धुळे शिवसेनेची मागणी

शेतकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करा धुळे शिवसेनेची मागणी


आग्रा महामार्ग क्रमांक तीनवर शिरपूर व सोनगीर टोल प्लाझा वरून अनेक शेतकऱ्यांचे वाहने शेताचा विविध प्रकाराचा माल घेऊन विविध तालुक्यात विक्रीसाठी जात असतात. परंतु, ह्या दोन्ही टोलनाक्यांवर शेतकऱ्यांच्या वाहनांना टोल लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत आहे, तरी टोल कंपनीने शेतकऱ्यांच्या वाहनांना व ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनांना टोलमुक्त करा, अशी मागणी शिरपूर तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास सोनगीर व शिरपूर टोल नाक्यावर शेतकऱ्यांना घेऊन मोठं उग्र आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत सिंह राजपूत यांनी सांगितले. सदरबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना देण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5