Skip to content Skip to footer

शिवसेना नगरसेवक महेश कोठे, यांची पक्षातून हकालपट्टी

शिवसेना नगरसेवक महेश कोठे, यांची पक्षातून हकालपट्टी

शिवसेना नगरसेवक महेश कोठे यांचीच कायमची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोठे यांचीच हकालपट्टी करण्यात आलेली आहे.

महेश कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र महाविकास आघाडीत बिघाडी नको म्हणून त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचे वृत्त होते. त्यानंतर लगेचच कोठे यांची हकालपट्टी केल्याची माहिती जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली.

शिवसेना नगरसेवक महेश कोठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश लांबणीवर पडला आहे. कोठे यांचा आज सकाळी 11 वाजता पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश नियोजित होता. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अंतर्गत खलबतांनंतर कोठेंचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. महाविकास आघाडीत वाद नको म्हणून प्रवेश लांबणीवर गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे

Leave a comment

0.0/5