Skip to content Skip to footer

यूएस कॅपिटॉल मधील हिंसक आंदोलनात तिरंगा दिसल्याने शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी भडकल्या

यूएस कॅपिटॉल मधील हिंसक आंदोलनात तिरंगा दिसल्याने शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी भडकल्या

राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला होता. तसेच कॅपिटॉल इमारतीत घुसून एकच गोंधळ घालून राडा केला होता. यावेळी ट्रम्प यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली होती. यामध्ये चार आंदोलकांचा मृत्यू झाला होता.

मात्र या सर्व घटनांमध्ये एका आंदोलकाच्या हातात तिरंगा झेंडा दिसला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओ वरून शिवसेना नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी चांगल्याच संतापल्या आहेत.

यावर ट्विट करून त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. ‘ “जो कोणी भारतीय झेंडा फडकवतोय त्याला लाज वाटली पाहिजे. दुसर्‍या देशात सुरू असलेल्या हिंसक आणि गुन्हेगारी कृतीत सहभागी होण्यासाठी आमचा तिरंगा वापरू नका”, अशा शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

तसेच भाजपा खासदार वरून गांधी यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरद्वारे म्हंटले आहे की, तिथे भारताचा झेंडा का आहे? असा सवाल विचारलाय. ही एक अशी लढाई आहे ज्यामध्ये आपण सहभागी होण्याची नक्कीच आवश्यकता नाहीये असंही गांधी म्हणाले.

Leave a comment

0.0/5