Skip to content Skip to footer

खूशखबर! नव्या वर्षात लाँच होणार TATA आणि Marutiचे 4 हॅचबॅक मॉडेल्स

1 एप्रिल 2020पासून BS कम्पलाइंट असणाऱ्या गाड्यांचे मॉडेल बाजारात विकले जाणार आहेत. त्यामुळे कार कंपन्यांनी आपल्या गाड्यांमध्ये काही अनोखे आणि खास बदल करुन नवीन मॉडेल्स लाँच करण्यात येणार आहेत. येणाऱ्या नव्या वर्षात मारुती आणि टाटा कंपनी हॅचबॅक मॉडेल्स लाँच करत आहेत. या कारबाबत उत्सुकता तर आहेच पण नवीन कार घेणाऱ्यांनी थोड थांबून हे मॉडेल्स घेण्याचा विचार करायला काहीच हरकत नाही. हॅचबॅच कार मॉडेल्सचं वेगळं महत्त्व आणि लोकप्रियता भारतात पाहायला मिळते.

2020 Celerio 

सिलेरियो ही कार 2014पासून बाजारात उपलब्ध आहे. या कारनं कंपनीला चांगला नफा मिळवून दिला होता. ऑटोकार इंडियाने दिलेल्या माहितीनुसार मारुती कंपनी सिलेरियो कार जुन किंवा जुलै महिन्यात लाँच करण्याच्या तयारीत आहे. 2020 Celerio कार Hearttect प्लॅटफॉर्मवर आधारातील असणार आहे. यामध्ये 1 लिटर पेट्रोल आणि BS-6 कम्पालाइंट पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. यासोबत 2020 Celerio कारचं सीएनजी मॉडेलही ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Ignis Face lift

मारुती कंपनीच्या इग्निस या मॉडेलमध्ये काही नवे बदल करून नव्या वर्षात म्हणजेच 2020 साली अपडेट वर्जनसोबत लाँच करण्यात येणार आहे. कारचं फ्रन्ट आणि इंटिरियर बदलण्याचा विचार असल्यानं त्याबाबत काही बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना इग्निसचा फ्रेश लूक पाहायला मिळू शकतो. नव्या इग्निस कारच्या मॉडेलमध्ये BS-6 सुविधा मिळणार आहे.

खूप दिवसांनंतर पुन्हा एकदा टाटाच्या टिएगो कारची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. टाटा कंपनीची टिएगो कार पुन्हा एकदा लाँच होणार आहे. कारमध्ये Altroz सारखे एंगुलर नोज पाहायला मिळतील. ह्या गाडीचा डिझेल वेरिएंट बंद करण्याबाबत सध्या विचार सुरू आहे. लाँच होणारं मॉडेल पेट्रोलवर चालणारं असेल आणि टिएगो कार BS-6 सोबत लाँच होणार आहे.

Tata Altroz  

टाटाची अपकमिंग प्रीमियर हॅचबॅककार म्हणून Tata Altroz मॉडेलकडे पाहिलं जातं. या कारबाबत अनेकांना उत्सुकता आहे. ही कार डिसेंबर 2019मध्येच लाँच करण्याचा कंपनीचा विचार सुरू आहे. Tata Altroz कारला Geneva Motor Show 2019 शोमध्ये दाखवण्यात आलं होतं. मात्र हे मॉडेल बाजारात कधी उपलब्ध होणार याबाबत माहिती दिली गेली नव्हती. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मारुती सुझुकी बलेनो कार आणि हुंडाई आय 20 कारला टक्कर देणारी कार म्हणून या कारकडे पाहिलं जात आहे.

बाजारात या 3 मॉडेल्समध्ये स्पर्धा होण्याची चिन्हं आहेत. Altrozसाठी कंपनीने 3 इंजिनचे पर्याय देणार आहे. दोन पेट्रोल आणि एक डिझेल अशा पद्धतीचं इंजिन या कारसाठी वापरलं जाईल. पहिलं इंजिन 1.2-लीटर थ्री-सिलेंडर पेट्रोल यूनिट मिळेल. दुसरं पेट्रोल इंजिन 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल यूनिट असेल. त्यामुळे या चारही मॉडेल्सकडे आता ग्राहकांची नजर असणार आहे. नव्या वर्षात टाटा आणि मारुती या हॅचबॅक कारवर लाँचिंगदरम्यान काय ऑफर्स देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या कारच्या किमतीबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

 

Leave a comment

0.0/5