Skip to content Skip to footer

शिवसेना प्रमुखांच्या अटकेप्रकरणी अजित पवारांनी भुजबळांचे नाव घ्यावे – उद्धव ठाकरे

शिवसेना प्रमुखांच्या अटकेप्रकरणी अजित पवारांनी भुजबळांचे नाव घ्यावे – उद्धव ठाकरे
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्या काळी करण्यात आलेली अटक ही वरिष्ठांच्या हट्टापायी करण्यात आली. बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती असं अजित पवार म्हणाले आहेत. या वक्तव्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले आहे.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेप्रकरणी अजित पवारांनी थेट छगन भुजबळांचे नाव घ्यावे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना बाळासाहेबांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूक होती, हे मी बोलल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळाले. त्यावेळी न्यायालयाने बाळासाहेबांची सुटका केली म्हणून ठीक आहे. मात्र एवढं सगळं होत असताना शरद पवार गप्प का होते असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यांनी वर्ष निघून जातात, कालांतराने ती परिस्थिती आपल्यावरच उलटते. एका पवारांनी शिवसैनिक शिवसेनेच्या विरोधात उभा केला आणि आता आपले संभाजी पवार उमेदवार त्या गद्दारला गाडायला उभे राहिले आहेत असं ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा :-शिवसेनेचा जाहीरनामा गरिबांच्या हितासाठीच

शिवसेनेचा जाहीरनामा गरिबांच्या हितासाठीच

Leave a comment

0.0/5