Skip to content Skip to footer

कोल्हापुरात “तानाजी : द अनसंग वॉरियर” चित्रपटाच्या पोस्टरला घातले हार

कोल्हापुरात “तानाजी : द अनसंग वॉरियर” चित्रपटाच्या पोस्टरला घातले हार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची शौर्यगाथा गाजविणारे तानाजी मालुसरे यांच्या शूर कथेवर आधारित ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत झाले. तर, बेळगावमध्ये कन्नड भाषकांनी या चित्रपटाचे पोस्टर चित्रपटगृहावरून काढून टाकून चित्रपट बंद करण्याच्या घोषणा दिल्या. याला तोडीस तोड उत्तर देत मराठी भाषकांनी नवा फलक चित्रपटगृहावर लावून सिनेरसिकांना तानाजी चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. काहीच दिवसापूर्वी तानाजी चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महारांचे एकेरी नाव घेणाऱ्या पत्रकारांच्या लक्षात अभिनेता शरद केळकर यांनी चूक आणून दिली होती. त्यामुळे सर्व स्तरातून केळकरांचे अभिनंदन करण्यात आले होते.

अजय देवगण यांचा बहुचर्चित तानाजी हा चित्रपट शुक्रवारी येथील पद्मा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अजय देवगणचा हा शंभरावा चित्रपट असल्याने त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच चित्रपटगृहाबाहेर लावलेल्या भव्य फलकावरील तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेस यांना मोठा हार अभिवादन केले. या वेळी या रसिकांनी छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांचा जयघोष केला आणि अजय देवगण यास शुभेच्छा दिल्या.

Leave a comment

0.0/5