Skip to content Skip to footer

तुमच्या व्हॉइस कमांडवर असते Google ची करडी नजर, Personal Data सुरक्षित कसा ठेवाल?

प्रत्येक माणसाच्या हाती आता स्मार्टफोन (Smart phone) आल्यामुळे सर्वांचंच आयुष्य स्मार्ट बनलं आहे. परंतु, तुमच्या या स्मार्ट लाइफवर कोणी तरी नजर ठेवून आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही म्हणाल, हे कसं काय शक्य आहे? परंतु, हे शक्य आहे. इतकंच काय तर, तुम्ही देत असलेस व्हॉईस कमांडवरही बारीक लक्ष ठेवले जाते. आता तुम्ही म्हणाल, आमच्यावर कसं कोणी बारीक लक्ष ठेवू शकतं?

तुम्ही गुगल क्रोम किंवा अँड्रोईड स्मार्टफोन वापरताना तुमच्यावर गुगल (Google) नजर ठेवून असतो. यावेळी तुम्ही प्ले स्टोर (Play Store) वरून कोणता अ‍ॅप (App) डाऊनलोड करता किंवा तुम्ही कोणत्या वेबसाईटवर क्लिक करत आहात, याबद्दलची सर्व माहिती गुगल आपल्याकडेही गोळा करून ठेवतो. इतकंच काय तर, गुगल असिस्टंट (Google Assistant) वापरताना तुम्ही देत असेलेले Voice Command ही गुगल स्वत:कडे सेव्ह करून ठेवत असते. त्यामुळे गुगल तुमच्या हालचालींवर कितपत नजर ठेवते, हे तुम्ही समजू शकता.

असं रोखा गुगलला

तुम्ही हे करण्यापासून Google ला रोखूही शकता. गुगलने स्टोर केलेला डेटा; प्रोफाईल सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला पाहता येतो. यासाठी गुगलनेच आपल्याला सेटिंग्जमध्ये पर्याय दिले आहेत. तुमचा पर्सनल डेटा अ‍ॅक्सेस करण्यासाठी सर्वप्रथम कॉम्प्युटरमधील जी-मेल ब्राऊजर ओपन करा. तुमच्या जी-मेल प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला ‘मॅनेज युअर गुगल अकाऊंट’ हे ऑप्शन दिसेल. तुमच्यासमोर नवीन टॅबमध्ये गुगल अकाऊंटसचं सेटिंग पेज ओपन होईल. तेव्हा ‘प्रायव्हेसी अँड पर्सनालाईजेशन’ ऑप्शनमध्ये दिलेल्या ‘मॅनेज युअर डेटा अँड पर्सनालाईजेशन’ ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही ‘अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल’ खाली असलेल्या ‘वेब अँड अप अ‍ॅक्टिव्हिटी’ ऑप्शनमध्ये प्रवेश करा. याच ठिकाणी गुगल तुमच्या मोबाईलमधील सर्व अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह करून ठेवत असतो. याठिकाणी तुम्ही तुमचं लोकेशन आणि युट्युब हिस्ट्रीही पाहू शकता. इथल्या टॉगल स्विचला तुम्ही ऑफ केलात तर, गुगल तुमचा डेटा सेव्ह करणं बंद करेल.

पर्सनल डेटा सुरक्षित ठेवणं आवश्यक

Google आपला युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यावर अधिक भर देतो. यासाठी गुगल आपल्या युजर्सला ऑप्शन देतो. जेणे करून युजर्सला त्याच्या गुगल काऊंटरवर कोण-कोणते डिवाईज अ‍ॅक्टिव्ह आहेत, हे समजेल. तसेच, जर तुम्ही कोणत्या डिवाईजमध्ये अकाऊंट लॉगआऊट करणं विसरला असाल तर, सेटिंग पेजवर जाऊन तुमचा डेटा सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे.

Leave a comment

0.0/5